Friday, 2 December 2016

बाल संस्कार मंत्र आणि स्तोत्र

*|| श्री स्वामी समर्थ ||*

*🚩बालसंस्कार मंत्र आणि स्तोत्र🚩*

मंत्रशास्त्र हे भारतीय संस्कृतिने जगाला दिलेले एक वरदान आहे. मन्त्र एक शब्द समूह तर काही वेळा फक्त एखादेच अक्षर, पण याचा मानवी जीवनावर, शरीरावर शीघ्र परिणाम होतो. मंत्राचे अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. पण श्रीगुरुने दिलेला मन्त्र हां शिष्यासाठी सर्वोत्तम.

मंत्राचे परिणाम हां खरे तर Phd चा विषय, थोडक्यात संपणार नाही. पण एक साधे उदाहरण-
वर्षा दोन वर्षाच्या मुलाला आई झोपेतून उठला की लगेच मोरीत (bathroom) उभे करते आणि आपल्या तोंडाने एक विशिष्ठ आवाज एका लइत काढ़ते.
कोणता आवाज ? तर "श ष स" या तीन अक्षरांचा. आणि ते बाळ सुसु करते. भारतातील कोणत्याही भाषेत आई याच तीन अक्षरातून हां परिणाम साधते. बाळा ला काही असे शिकवले नसते की, ऐसा आवाज काढला की सु करायची.

हे घडते कसे ?
तर मूलाधार हे चक्र आपल्या गुदद्वार आणि मूत्रमार्ग यांच्या मधील शिवणि मधे असते. या चक्रावर "श ष स" या तीन वर्णाचा प्रभाव योगशास्त्रात सांगितला आहे. आणि या तीन वर्ण जेव्हा कानी पडतात तेव्हा हे चक्र काम करते आणि मूत्रविसर्जन होते.

मग प्रश्न पडतो की मोठ्या मांणसावर याचा का नाही परिणाम होत ? तर वर वर्षे 7 पर्यत कुण्डलिनी शक्ति अर्थात ही चक्र जागृत असतात. त्यामुळे लहान मुलाना "मी" पना नसतो, कपडे नसतील तर लाज वाटत नाहीं, निरागसता असते. पुढे ही कुण्डलिनी सुप्ता वस्थेत जाते. आणि खुप प्रयत्नाने जागी करावी लागते.

त्यामुळे मंत्र हे आपल्या शरीरावर काम करतातच, म्हणून आपल्या गुरूंनी नाडीवर मंत्र म्हणांयचे ते सांगितले. स्व संरक्षण आणि आरोग्य या साठी मन्त्र आपल्या हाताच्या नाडिवर दुसर्याहाताची मधली तीन बोटे ठेऊन स्पष्ट उच्चारात मन्त्र म्हणावेत. गायत्री, महामृत्युंजय, शबरीमन्त्र, नावर्णवमंत्र, आणि श्रीस्वामिसमर्थ मन्त्र ही पंचकड़ी  आपल्याला दिली आहेत.

याचा उच्चार मात्र स्पष्ट झाला पाहिजे.  त्याप्रमाणे आपण उच्चार दोषासाठी त्या देवतेची क्षमा मागतो. पण सारखे सारखे चुकायचे आणि क्षमा मागायची , हे बरोबर नाही. सतत प्रयत्न आणि अभ्यास हेच यावर उत्तर आहे.

मंत्र आणि स्तोत्रांचे प्रक्षिक्षण खऱ्या अर्थाने आपल्याला सप्ताहांत मिळत असते.
दररोज होणाऱ्या नित्य स्वाहाकारात विविध स्तोत्र, मंत्रांचा स्वाहाकार केला जातो.

*मंत्र:* श्री स्वामी समर्थ , नवार्णव मंत्र, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, विष्णु गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री, दत्त महाराजांचा बीजमंत्र, मल्हारी मार्तन्ड मंत्र, शाबरी मंत्र, श्रीदत्त गायत्री मंत्र, परब्रम्हाचा मंत्र, नावनाथांचा मंत्र , पांडुरंगाचा मंत्र, ऐक्य मंत्र

*स्तोत्र:* श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पर्जन्य सूक्त, स्वामीचरित्र अवतरणिका , गुरुचरित्र अवतरणिका , विष्णुसहस्त्रनाम, अथर्वशीर्ष, रूद्र, कालभैरवाष्टक

*ग्रंथ:* श्रीगुरुचरित्र, नवनाथ , श्रीमद् भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, मनाचे श्लोक, गिताई ,  स्वामीचरित्र सारामृत, दुर्गासप्तशती 

या सर्वांचा परिणाम शरीरावर किती चांगला होत असतो हे या स्तोत्र मंत्रांचे दिलेले वैज्ञानिक विश्लेषण:

*🔺ऐक्य मंत्र:* ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.

*🔺नवार्णव मंत्र:* मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे.
मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.

*🔺रामरक्षा:* राम रक्षा स्तोत्रातील 'र ' च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते.

*🔺गायत्री मंत्र:* गायत्री  मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे  हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.

*🔺काल भैरावाष्टक:*  कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते.
मुलांनी गंध टिळा  लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active  होतात.

*🔺प्रज्ञा विवर्धन स्तोत्र:* याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.

*🔺सरस्वती मंत्र , सुर्य मंत्र , गणपती अथर्व शीर्ष :* मेंदू मध्ये cortex  नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.

*🔺विद्याप्राप्तीकारक स्तोत्र:*या स्तोत्राच्या पठणाने DHA  नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे  होतो.

*दत्त महाराजांचा मंत्र* "द्रां " हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ).

*🔺शाबरी मंत्र:* Dopamine हार्मोन ची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोन चा balance राखला जातो.जर हार्मोन्स वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य.

हे सर्व स्तोत्र मंत्र आपण शिकुन म्हणायला हवेत
🌺.श्री स्वामी समर्थ🌺

No comments:

Post a Comment