दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा
निघालो घेऊन दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
रत्नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळुक कोवळी चंदनासारखी
सातजन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत माया-मूर्ति पहाटेसारखी
वाट वळणाची जिवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियांत गंगा जाहली बोलकी
🌺🌺शुभ प्रभात 🌺🌺🌺 ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
No comments:
Post a Comment