*कृष्णावतार चिंतन*
कृष्ण अवतार द्वापारयुगात भगवान विष्णुने घेतलेला अठावा अवतार आहे.
एकुण चार युग आहेत. कृत , त्रेता, द्वापार आणि कलि.
कृतयुगात एकुण चार अवतार झाले. १)मत्यअवतार,२)कूर्म अवतार,३) वराह अवतार आणि ४) नृसिंहअवतार .
त्रेतायुगात तीन अवतार झाले. १) वामन अवतार, २) परशुराम आणि ३) दाशरथी राम अवतार .
द्वापारयुगात फक्त एकच अवतार झाला तो म्हणजे *श्रीकृष्ण* .
कलियुगात नववा अवतार झाला तो बौद्ध .हा बौद्ध म्हणजे गौतमबुद्ध नव्हे तर बौद्ध अवतार म्हणजेच पंढरीचा *पांडुरंग*
आणि दहावा अवतार अजुन व्हायचा आहे तो म्हणजे कलि.
*अवताराची मिमांसा*
*अवतरति इति अवतारः|* अशी अवताराची व्याख्या आहे. अवतार म्हणजे अवतरण. वरून खाली येणे.
मग भगवंताला आपले स्थान सोडुन खाली पृथ्वीवर का यावे लागते ? तर स्वतः भगवंनी अर्जुनाला उपदेश करताना सांगीतले आहे की, मी अवतार का घेतो ? तर
*यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत |*
*अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ||*
ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, ( या ठिकाणी ग्लानी याचा अर्थ झोप नव्हे) ग्लानी याचा अर्थ आद्य जग्तगुरु श्रीमद्शंकराचार्यांनी हाणी असा सांगीतला आहे. ज्या वेळेस धर्माची हाणी होते ,धर्माची घडी विस्कटते, माणसं पशुसारखी वागु लागतात, पाप पुण्याचं भय शिल्लक रहात नाही, जनावराला सुद्धा लाज वाटेल असं माणसं वागायला लागतात तेंव्हा भगवताला अवतार घ्यावा लागतो. मग अवतार घेवुन भगवान काय करतात ? तर
*परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृताम् |*
*धर्म संस्थापणार्थाय संभवामि युगायुगे||*
भगवान म्हणाले मी अवतार घेवून साधु,संत,सज्जनांचे रक्षण करतो, आणि दुष्टांचा संहार करतो व धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा बसवतो.
येथे भगवान प्रत्येक अवतारात वेगळा धर्म स्थापन करित नाहीत.तर मूळ आर्य सनातन धर्म आहे त्याची विस्कटलेली घडी आवतार घेवून पुन्हा बसवतात.
कृष्ण अवतारात कंसचाणुरादि दैत्य माजले होते, यज्ञयागादि कर्म बंद पडली होती. याकरता स्वतःच्या मामाला सुद्धा ठार मारून धर्माची संस्थापना केली. कृष्ण हा पूर्ण अवतार आहे. गोपगोपी, व्रजवासीयांना कृष्णाने सहवासाचे प्रेम देवुन सर्व जीवाना ब्रह्मानंद प्राप्त करुन दिला . कृष्णाचे चरित्र अगाध आणि अद्भूत आहे म्हणून कृष्ण चरित्र फक्त ऐकावे, श्रवण करावे व रामचरित्र म्हणजे रामाचा आचार जीवनात आणावा तरच जीवन आनंदमयी होईल.
राष्ट्रीय कीर्तनकार
*हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी* पुणे यांच्या चिंतनातुन .
Thursday, 25 August 2016
कृष्णावतार चिंतन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment