Wednesday, 10 August 2016

नशिबाची गोष्ट

*एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.*

*पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.*

*एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.*

*सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.*

*तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो...आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...*

*आणि*

*या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...*

*माणसाचं आयुष्य हे असंच असतं...*

*त्याच्या हातात काहीच नसतं...*

*आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...*

*कर्ता करविता असतो तो ईश्वर...*

*एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...*

*मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...*

*कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...*

*'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'*

*आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...*

*कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...*

*'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?*

*'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...*

*त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?*

*'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?*

*एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...*

*ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?*

*त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?कोण सांगेल? कोण सांगेल कोण??कुणीच नाही...* 
*हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!*

*मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..राजहंस मरताना सुद्धा गातो....*

*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.*

*यालाच जीवन म्हणतात.*

*किती दिवसाचे आयुष्य असते?आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळूनकारण या जगात उद्या काय* *होईलते कोणालाच माहित नसते...!!*
*नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....* 
*कोणाचा अपमान करू नका आणि* *कोणाला कमीही लेखू नका.....*
*- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,*
*पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....*
*- कोणी कितीही महान झाला असेल,*
*पण निसर्ग कोणाला कधीच* *लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......*
*स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......*
*देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.....
🙏🙏�🙏� gm hnd 🙏�🙏�🙏

No comments:

Post a Comment