भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.
जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा...
माणसांच्या गर्दीत
हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......
एकुलता एक दादा
त्याला जिवापाड जपला
लग्न झाल्या पासून
वाहिनी च्या पदरा आड लपला
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ
सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......
नको दादा साडी मला
नको पैसा पाणी
तुझ्या सूखा साठीच
देवा ला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ....
काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरले फोड बघून
तूझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात
तू घाबरुन नको जाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...
उचलत नाहीस फोन म्हणून
वहीनीला केला
Wrong नम्बर करत
कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...
आई बाबा सोडून गेले
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ
डोळ्यामधी आले
वाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....
नको मला जमीन
नको घराची वाटणी
आवडीने खाईन
भाकरी आणि चटणी
काकूळती ला आला जीव
मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ .....
No comments:
Post a Comment