Saturday, 10 September 2016

अष्टविनायक दर्शन - मोरेगावचा मयूरेश्वर - 1

नमस्कार सेवेकरी हो 🙏🏻🚩

श्री गणेशउत्सवा निमित्ताने आपण आपल्या ब्रह्मांडनायक या पेज वर अष्टविनायक दर्शन घेणार आहोत 🚩🙏🏻💐

चला तर आज पहिल्या गणपती चे दर्शन व माहिती घेऊ 🚩🙏🏻💐

🚩अष्टविनायक भाग १🚩

🚩पहिला गणपती💐

🚩मोरगाव मयुरेश्वर 🙏🏻

🚩निजे भूस्वानंदे जडभरत भूम्या परतरे ।
तुरियास्तीरे परमसुखदेत्व निवससि ।।
मयुराया नाथा तवमसिच मयुरेश भगवान ।
अतस्त्वा संध्याये शिवहरिरणी मयुरेश ब्रम्हजनकम ।।१।।🙏🏻

अर्थात – हे मयुरेशा, तू सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद क्षेत्रात जडभरतमुनिच्या भुमीमध्ये, कऱ्हा नदीच्या तीरावर असलेल्या मोरगाव या सुखदायी क्षेत्रात वास करतोस.तुरिया अवस्थेत असल्यामुळे शिवशंकरांना तू ब्रम्हानंद देतोस. हे मयुरेश्वरा, मयुर हे आसन आसणा-या तुला माझा नमस्कार. ब्रम्हदेवाने उभारलेल्या तुझ्या ह्या देवळात दक्षिणेस रक्षणासाठी शंकर व उत्तरेला सुर्य सिध्द केले आहे.🚩🙏🏻

🚩गाणपत्य सांप्रदायाच्या साडेतीन पीठांपैकी आद्यपीठ, मोरगाव क-हा नदीच्या काठावर वसलेले आहे.अष्टविनायक यात्रा प्रथेप्रमाणे येथील श्री मयुरेश्वराचे (मयुरेश्वर) दर्शन घेऊनच यात्रा सुरू केली जाते व सर्व अष्टविनायकांचे दर्शन घेऊन पुन्हा मोरेश्वराचे दर्शन घेतल्यावर ती संपूर्ण झाली असे समजले जाते.

मयुरेश्वराचे मंदीर उंच तटबंदीने वेढलेले असून उत्तराभिमुख आहे. पाय-या चढून गेले की नगारखाना खाली पुढच्या दोन भागात लाडू घेऊन गणेशाकडे तोंड करून उभा असलेला दगडी मुशकराज आहे. त्याच्या पुढील चौथ-यावर येथील वैशिष्ठ म्हणजे नंदी आहे. त्याबद्दल असे सांगितले जाते की, मोरगावच्या जवळच असणा-या शिवमंदीरात स्थापन करण्याकरीता गाडय़ावरून नंदी नेत असता अचानक
गाडा मोडला आणि नंदी त्या ठिकाणी जो बसला तो काही केल्या हलेचना पुढे एका कारागीराच्या स्वप्नात येऊन नंदीने मला येथून हलवू नका म्हणून दृष्टांत दिला. चौथा-यांच्या पुढे सभामंडप आहे. 🙏🏻

सभामंडपाच्या भोवती तटबंदीच्या आतील चौकात आठ दिशांना गणेशाच्या एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नहर्ता, विघ्वराज, धूम्रवर्ण व वक्रतुण्ड अशा नावाच्या अष्टप्रतिमा आहेत. सभामंडपातनंतर गाभारा लागतो.
सुखहर्ता दुखहर्ता..... ही आरती समर्थ रामदास स्वामींस ज्यांच्या दर्शनाने स्फुरली ती, मोरेश्वराची मनोहारी मुर्ती सभामंडपातूनच लक्ष वेधून घेते. मुर्ती पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची असून मुर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत. श्री च्या मस्तकावर नागराजाचा फणा पसरलेला आहे. तसेच त्याच्या डाव्या उजव्या बाजूस ऋध्दी -सिध्दीच्या पितळी मुर्ती आहेत.

🚩अख्यायिका -🙏🏻

गंडकी नगराचा राजा चक्रपाणी याला सुर्याउपासनेतून पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव त्याने सिंधू असे ठेवले. सिंधूने सुध्दा सुर्यदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचा वरदान मिळवला. परंन्तू वरदान मिळताच सिंधूराज उन्मत झाला.त्रिलोक्याच्या लालसेने त्याने पृथ्वी जिंकली व देवांस गंडरी नगरीत बंदीवासी केले. त्याच्या जाचाला कंटाळून देवांनी संकट विमोचनार्थ गणेशाची आराधना सुरू केली त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन, ‘लवकरच पार्वती मातेच्या पोटी जन्म घेऊन मी तूमची सुटका करेन.’ असा आशिर्वाद दिला. भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेशाने बालकरूपात अवतार घेतला. काही दिवसांनी मोरावर आरूढ होऊन गणेशाने सिंधू राजाबरोबर युध्द आरंभले. गणेशाने कमलासुराचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराचे मस्तक ज्या ठीकाणी पडले तेच मोरगाव. थोडय़ाच कालावधीत गणेशाने सिंधूराजाचा वध करून देवास मूक्त केले. मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश मोरेश्वर - मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. तर येथील स्थानास मोरगाव
म्हणून ओळखू जावू लागले.

॥ श्री गजानन मयुरेश्वर नमो नम:॥🙏
🏻🚩💐

No comments:

Post a Comment