Sunday, 25 September 2016

जय मल्हार आर

Gggruer🚩 येळकोट येळकोट जय मल्हार ।।

*अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी*

जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…

जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…

हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…

अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी,
देव गेले जेजुरा निळा घोडा…

अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा…

पाव मे तोडा… कमरी करगोटा,
बेंबी हिर, मस्तकी तुरा…

खोबर्‍याचा कुटका.. भंडार्‍याचा भडका
बोल अहंकरा, सदानंदाचा येळकोट…

जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…

जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…

*सदानंदाचा येळकोट*

येळकोट येळकोट जय मल्हार

श्री देव मल्हारीमार्तंड खंडेराय मंदिर श्री क्षेत्र जेजुरीगड......।।

*- श्री क्षेत्र जेजुरी*

श्री देव मल्हारीमार्तंड खंडेराय मंदिर श्री क्षेत्र जेजुरीगड (श्री क्षेत्र जेजुरी)

I
।। श्री क्षेत्र जेजुरी
मंदीर ।।
          

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत जेजुरगडाच्या मागच्या बाजूने अवघड डोंगरवाटा पार करत कडेपठारावर जाण्याचा मार्ग होता. आता देवस्थान समितीने पायऱ्यांचा अधिक सोपा आणि गडावर जलद घेऊन जाणारा मार्ग केला आहे. त्यामुळे, कडेपठारी येणाऱ्या भक्तांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

जेजुरीवर मध्यभागी बाणाई या शिवभक्त पत्नीचे मंदिर असून, कडेपठार या डोंगरातही ते आहे. त्याशिवाय मार्गावर सिसुरटिंगी हे ठिकाण असून तेथे मंदिर आहे. जवळच खंडोबाचे हेगडी प्रधान भगवान विष्णू महाराज यांचेही मंदिर आहे. भाविकांनी जेजुरगडाच्या मार्गावर दीपमाळा, कमानी, पायऱ्या बांधल्या असून, त्यावर नोंदी आहेत.

जेजुरीच्या मंदिराचे बांधकाम शके १६१८ मध्ये झाले. त्यानंतर, खटावकर आणि होळकर, राजे शिवदे, विंचूरकर व दाभाडे सरकार यांनी गडाला भक्कम दगडी व उंच तट बांधले. त्यामुळे, आजही जेजुरगडाचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम नजरेत भरते.मुख्य मंदिराचा सभामंडप राघो मंबाजी यांनी इ.स. १६३७ मध्ये बांधला असून इ.स. १७४० मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांनी परिवारासह भेट देऊन जेजुरीच्या मंदिराचा तट व दीपस्तंभ बांधल्याचा इतिहास आहे.

मुख्य स्वयंभू िलगाच्या मंदिरावर शिखरामध्ये महादेवाचे शिविलग आहे. महाशिवरात्रीला शिडी लावून हजारो भाविक  छतावरूनच या शिविलगाच्या दर्शनासाठी जातात.

🚩: *तळी भरतायेत का जागरण गोंधळाची दिवटी पूजा आहे?*

तळी भरत असतील ते उभं राहून तळी भरत नाहीत. घोंगडीवर बसून भंडार्-खोबर्‍याची अन तांबं पितळांने मढवलेल्या देवाच्या समोर भरली जाते. कधी कधी 'वांगेसट' म्हणजे बाजरीची भाकरी , वांग्याची भाजी , वरण - भात आणि मेथीची भाजीचा नैवेद्य असतो. डोक्यावर टोपी किंवा रुमाल असावाच लागतो.

अन जागरण गोंधळाची पाचपावली असेल तर नवरदेव , जागरण गोंधळ कड्या-साखळी अन त्याच्या खांद्यावर घोंगडी लागतेच.

सदानंदाच्या नावानं चांगभरल, येळकोट येळकोट जय मल्हार, राज्या सर्ज्याच्या नावानं चांगभलं. !

No comments:

Post a Comment