Sunday, 18 September 2016

गीतरामायण 1. स्वये श्रीरामप्रभु ऐकती

🌺🌺श्री गणेशाय नमः🌺🌺

सुप्रभात मिञांनो🌷🌴🌷

शुभ सोमवार🌳🌷🌳

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा☺संपूर्ण आठवडा आपणास आनंदात जावो 🌷 🌴🌷

🌴🌷☺जय श्री राम ☺ जय श्री राधेश्याम☺🌷🌲🌷🌴

आज हया शुभ दिनाची सुरूवात करूया गीतरामायणाने☺

गीतरामायण हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला.गीतरामायणात एकुण 56 गीते आहेत.

                 🌱🌹🌲 गीतरामायण🌲🌹🌱

१    स्वये श्रीरामप्रभु ऐकती

Svaye ShriRam Prabhu

स्वयें श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती

ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत-वैभव गाते कोकिल
बालस्वराने करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमीं श्रोतेजन नाहती

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्‍कट
प्रभुचे लोचन पाणावती

सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्‍त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परि तो उभयां नच माहिती
Random song suggestion
आठवतो का बालपणा
मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा   

  सुधीर फडके

No comments:

Post a Comment