उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिचा नायक, सुखदायक भक्तांसी
अंगी शेंदुराची उटी, माथां शोभतसे कीरिटी
केशर कस्तूरी लल्लाटीं, हार कंठी साजिरा
कानीं कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा
माजी नागबंदी शोभा, स्मरतां उभा जवळी तो
कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकांची वाटी
रामानंद स्मरतां कंठी, तो संकटी पावतो !!
Suprabhat ... !!
No comments:
Post a Comment