कृपाळू स्वामीनाथ, दे साधकांसी हात !
काम क्रोध गर्तेत, बुडता त्वरित देई हात !
मोहमाया गुंत्यात, फसता सोडवी त्वरित !
नाम तुझे राहो, अखंड मम जिव्हेत !
रुप तुझे राहो, अविरत मम हृदयात !
स्फुरण तुझे राहो, अखंड मम हृदयात !
कृपाछत्र राहो, अखंड शिरी ठेवी हात !
देहभाव जावो, राहो अखंड आत्मरुपात !
तव पुण्यतिथीसी उठे, प्रार्थना ही हृदयात !
कृष्णदास प्रार्थी तात, स्वामी आशीर्वादाचा हात !!
!! ॐ नमो श्री भगवते स्वामी समर्थाय नम: !!
No comments:
Post a Comment