Saturday, 10 September 2016

अष्टविनायक- 2. सिद्धविनायक 3.बल्लाळेश्वर

नमस्कार सेवेकरी हो 🙏🏻🚩

आज आपण आपल्या अष्टविनायक यात्रे मध्ये दोन गणपती चे दर्शन घेणार आहोत 🙏🏻🚩

🚩अष्टविनायक यात्रे मधला दुसरा गणपती  सिध्दटेक चा सिध्दीविनायक 🚩💐🚩

🚩आणी तिसरा गणपती पाली गावचा बल्लाळेश्वर 🙏🏻🚩💐

🚩🚩🚩🚩🚩

🚩अष्टविनायक भाग -२ 🚩

🚩सिध्दटेकचा सिध्दिविनायक🚩

🚩अष्टविनायकामधील दुसरा गणपती सिध्दटेकचा सिध्दिविनायक.🙏🏻

अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे की त्याची सोंड उजव्या बाजूस आहे.

मधु व कैटभ या असूरांशी भगवान विष्णु अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करन विष्णूने असूरांचा वध केला.  🙏🏻

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला.

१५ फूट उंचीचे व १०फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 🙏🏻🚩

३ फूट उंच व २.५ फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.त्याच्या एका मांडीवर रिध्दी व सिध्द बसल्या आहेत. उत्तराभिमुखी असलेली यामूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. 🙏🏻🚩
यादेवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे 5 किलोमीटर फिरावे लागते.हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकीपरत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.🙏🏻

🚩जाण्याचा मार्ग :अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक येथे हे मंदिर आहे. पुण्यापासून अंदाजे ९९ किलोमीटरवर देऊळ आहे.🙏🏻🚩

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

🚩 अष्टविनायक भाग - ३

🙏🏻🚩पाली गावचा बल्लाळेश्र्वर🚩🙏🏻

अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. 🚩🙏🏻

🚩अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. त्याच्या या भक्तीपायी त्याचे वडील कल्याणीशेठ व गावकरयांनी त्याला बेदम मारून एका खोलीत कोंडून ठेवले. तेव्हा गणपतीने ब्राम्हणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून येथील गणपती बल्लाळेश्वर नावाने प्रसिध्द झाला.🚩🙏🏻

या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे अष्टविनायकांत या एकाच गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिरयांपासून बनवले आहेत.🚩🙏🏻

🙏🏻🚩जाण्याचा मार्ग :हे देऊळ पाली या गावी असून पुण्यापासून ११० किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोली मार्गे आपण बल्लाळेश्र्वरला जाऊ शकतो.🚩🙏🏻

🚩 बोला गणपती बाप्पा मोरया 🚩🙏🏻💐🍁🔆

No comments:

Post a Comment