🙏 *पितृस्तोत्र* 🙏
(मार्कंडेय पुराण , गरुड पुराण)
रूचि उवाच -
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्। नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा। सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान्।।
मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा। तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा। द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्। अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि:।।
प्रजापते: कश्यपाय सोमाय वरुणाय च। योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि:।।
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु। स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा। नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।।
अग्निरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्। अग्निषोममयं विश्वं यत एतदशेषत:।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तय:। जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण:।।
तेभ्योखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतामनस:। नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज।।
रुची बोलले -
'अर्चित , अमूर्त व दीप्त तेजाच्या ,दिव्य चक्षुच्या पितृगणांना मी नमस्कार करतो.
इंद्रादी देवांचा नेता ,दक्ष व मारीच यांचा नेता,सप्तर्षींचा नेता,सर्व कामना पूर्ण करणाऱ्या पितरांना मी नमस्कार करतो.मनू आदींचा नेता,सूर्य-चंद्राचा नायक;अशा सर्व पितृगणांना मी नमस्कार करतो.नक्षत्र,ग्रह यांचा नेता,वायू व अग्नी यांचा नेता,नभ ,द्यावा ,पृथ्वी यांचा नेता असणाऱ्या पितरांना मी कृतांजली होऊन प्रणाम करतो.प्रजापती कश्यप,सोम ,वरुण ,योगेश्वर यांना मी हाथ जोडून नमस्कार करतो.सात लोकांतील सात गणांना मी प्रणाम करतो.स्वयंभु योगचक्षुच्या ब्रह्मदेवांना मी नमस्कार करतो.सोमधर व योगमूर्तिंधर पितृगणांना,जगताच्या पित्यास,सोमास मी नमस्कार करतो.अग्निरूप अन्य पितरांना मी नमस्कार करतो.हे सर्व विश्व अग्नी-सोममय आहे.सर्व जगताच्या रूपानं पिताच आहेत.या सर्व योगी पितरांना मी प्रणाम करतो.
सर्व स्वधा भोगी माझे पितर प्रसन्न व्हावेत '.
हे स्तोत्र शक्यतो ह्या पितृपक्षा त बोलावे व ॐ पितृभयो नमः हा जप करवा . व प्रत्येक दिवशी कावळ्याला थोडा दही भात थोडे काळे तीळ व थोडे तूप घालावे. *आपल्या संतती आणि कुळासाठी फार लाभदायक ठरते .* 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
No comments:
Post a Comment