Monday, 19 September 2016
26.11.08 अतिरेकी हल्ला- प्रमुख व्यक्तींचे बलिदान
मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्ती संपादन करा
प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिस वीरमरण पावले आहेत.[५८]
तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले.
हेमंत करकरे - मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी
अशोक कामटे - ऍडिशनल पोलिस कमिशनर
विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट
शशांक शिंदे - वरिष्ठ पोलिस निरिक्षक
मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी
हवालदार चंदर - एन.एस.जी. कमांडो
हवालदार गजेंदर सिंह बिष्ट - एन.एस.जी. कमांडो
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.[५९]
अँड्रियास लिव्हरास हा ब्रिटिश उद्योगपती हल्ल्यांत मृत्यू पावला.[६०] जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जी आणि तिचा नवरा हेही मृतांत आहेत.[६१][६२] नरीमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग, त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग हे मृत्युमुखी पडले.[६३]
महाराष्ट्र सरकार ने प्रत्येक मृताच्या नातेवाईकास ५ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.[६४]
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment