Friday, 23 September 2016

वैश्वानर विद्या

||श्री स्वामी समर्थ||

||वैश्वानर विद्या||

वैश्वानर विद्या म्हणजे स्वतःचे शरीर सोडुन सुक्ष्म शरीराने संपूर्ण ब्रम्हांडात कोठेही फिरणे !

एकाच आसनावर बसून तास-दीड तास जप करण्याची सवय (practice) झाल्यानंतर ही विद्या साधकाला साध्य होऊ शकते. यासाठी सुरवातीला किमान सहा महीने तरी एकाच आसनावर बसून न हालता न डुलता दररोज दीड तास जप करावा. म्हणजे वैश्वानर विद्येसाठी आवश्यक इतकी योग्यता प्राप्त होते. इतके केल्यानंतर पुढील प्रमाणे साधना करावी.
पाठीवर झोपावे पाय व हात सरळ व ताठ असावेत . पूर्व पश्चिम असे झोपावे. डोके पूर्वेकडे असावे. पाय पश्चिमेकडे असावेत. डोळे मिटावेत.
प्रथम दीर्घ श्वास घेऊन तोंडाने सोडून द्यावा. अशाप्रकारे सुमारे चार-पाच वेळा करावे. यानंतर आपले सर्व अंग एकदम सैल सोडावे डोळे मिटावेत. मनाचेच डाव्या पायाच्या अंगठयाकडे पहावे व ॐ असे म्हणावे. नंतर प्रत्येक बोटाकडे एक एक क्षण पहात ॐ म्हणावे. नंतर पोटरीकडे पहात ॐ म्हणावे. नंतर मांडीकडे पाहुन ॐ म्हणावे. तदनंतर उजव्या पायाच्या अंगठयाकडे पाहुन ॐ म्हणावे. नंतर उजव्या पायाच्या एक एक बोटाकडे पाहुन ॐ म्हणावे. बोटे झाल्यानंतर उजव्या पायाच्या मध्यभागी पाहुन ॐ म्हणावे. नंतर उजव्या पोटरीकडे पाहात ॐ म्हणावे व नंतर मांडीकडे पाहुन ॐ म्हणावे. यानंतर नाभी केंद्रावर लक्ष ठेवुन ॐ म्हणावे व छातीकडे पाहुन ॐ म्हणावे. नंतर डाव्या हाताच्या तळव्याकडे पाहुन ॐ म्हणावे. नंतर डाव्या हाताच्या मनगटाकडे पाहून ॐ म्हणावे.नंतर डाव्या हाताच्या दंडाकडे पाहात ॐ म्हणावे. डाव्या हाताच्या खांद्याकडे पाहात ॐ म्हणावे. नंतर उजव्या हाताच्या तळव्याकडे पाहात ॐ म्हणावे. उजव्या हाताच्या मनगटाकडे पाहात ॐ म्हणावे. नंतर उजव्या हाताच्या दंडाकडे पाहात ॐ म्हणावे. तदनंतर उजव्या हाताच्या खांद्याकडे पाहात ॐ म्हणावे.
यानंतर कंठाकडे पाहात ॐ म्हणावे. यानंतर दोन्ही ओठांकडे पाहात ॐ म्हणावे. यानंतर दोन्ही कानांकडे पाहात ॐ म्हणावे. यानंतर दोन्ही गालांकडे पाहात ॐ म्हणावे. यानंतर दोन्ही डोळ्यांकडे पाहात ॐ म्हणावे. यानंतर भ्रूमध्याच्या ठिकाणी पाहात ॐ म्हणावे. यानंतर ब्रम्हरंध्राकडे पाहात ॐ म्हणावे. यानंतर कंबरेकडे पाहात ॐ म्हणावे. कंबरेकडे पाहात ॐ म्हणतांना आपण पाठीमागच्या बाजूने आपली पाठ पहात आहोत, अशा पद्धतीने ॐ म्हणावे. म्हणजे मूलाधार चक्राच्या ठिकाणी  ॐ म्हणावे. नंतर स्वाधिष्ठानचक्राच्या ठिकाणी ॐ म्हणावे. नंतर मणिपुरचक्राच्या ठिकाणी ॐ म्हणावे. तदनंतर अनाहतचक्राच्या ठिकाणी ॐ म्हणावे. नंतर विशुद्धचक्राच्या ठिकाणी ॐ म्हणावे. नंतर
आज्ञाचक्राच्या ठिकाणी ॐ म्हणावे. व नंतर सहस्त्रारचक्राच्या ठिकाणी ॐ म्हणावे.एकंदरीत साधकाने येथे सतत ॐ म्हणत राहायाचे असते व सतत मनातल्या मनात ॐ म्हणत असतांना आपले लक्ष मात्र अतिशय हळूहळू एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे न्यायचे असते, हे साधकांच्या लक्षात आले असेलच !

सर्वात शेवटी ब्रम्हरंध्राच्या ठिकाणी ॐ म्हणत साधकाने आपले लक्ष ब्रम्हरंध्रावर केंद्रीत करायचे असते.
न कंटाळता अनेक दिवस ही साधना करावी लागते. असे करता करता एक दिवस असा येतो की, साधक आपल्या शरीराच्या बाहेर येतो व दूर उभे राहून आपल्या शरीराकडे पाहू लागतो. त्याच्या लक्षात येते की, त्याचे स्थुल शरीर व त्याचे सुक्ष्म शरीर यांना जोडणारी एक रुपेरी दोरी (silver cord) अस्तित्वात असुन, सुक्ष्म देहाने साधक जरी ब्रम्हांडाच्या दुसऱ्या टोकाला गेला, तरीही ही रुपेरी दोरी तुटत नाही.
ही रुपेरी दोरी जेव्हा तुटते स्थूल शरीर व सुक्ष्म शरीर यांचा संबध तुटतो व स्थूल देह मरतो.
शरीरातून बाहेर पडुन इतरत्र फिरण्याची साधकाला हळूहळू सवय होते. समस्त ब्रम्हांडात साधक कोठेही फिरू शकतो वैश्वानर विद्या (astral travelling) त्याला साध्य झालेली असते. जर एखाद्याला परकायाप्रवेश सिद्धी प्राप्त करायची असेल, तर प्रथम वैश्वानर विद्या त्याला शिकावी लागते. वैश्वानर विद्येमध्ये पूर्ण पारंगत झाल्यानंतर साधक परकाया प्रवेश विद्या शिकतो व जीवनमुक्तीच्या मार्गातील अडथळ्यांवर विजय मिळवितो.

संकलन:- श्री दत्तावधूत वाड्मय

||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||

No comments:

Post a Comment