Wednesday, 11 November 2015

आईची वेडी माया l

निम्बोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला सय माझी येत नाही l

गाय झोपली गोठ्यात ,घरट्यात चिऊताई
बालपण आठवून  त्याचे जीव कासावीस होई
तळहाती जोजवुनी गात असे मी अंगाई
आज माझ्या चिमण्याला आई आठवत नाही ll

शिकुनिया मोठा झाला.फळा आली पुण्याई
कष्ट सारे विसरले.मन आनंदाचे डोहि
खुश राहो बाळ माझा.विनविते अम्बाबाई
आज माझ्या लाडक्याला.भेटायाला येळ नाही ll

सुखी राहा संसारात .मागण मागते आई
आठवण येता तुझी ,जीव घालमेल होई
पदर पसरते मी तुझ्यापुढे सूनबाई
लेकराच्या भेटी.भीक मागते मी वेडी आई ll

No comments:

Post a Comment