Sunday, 20 December 2015
समृद्ध जीवन ग्रुप ला सहकार मंत्रालयाचा दणका
मुंबई : ‘समृद्ध जीवन’च्या महेश मोतेवारांना सहकार मंत्रालयानं दणका दिला आहे. महेश मोतेवार यांच्या समृद्ध ग्रुप कंपनीचे सर्व खाती तातडीनं सील करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सहकार मंत्रालयाकडून याबाबत विशेष तपास सुरु होता. तो पूर्ण झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
सेबीनं बंदी आणूनही 525 कोटींचा महसूल टीव्ही चॅनल्स आणि संलग्न बिझिनेसमध्ये गुंतवला. त्यामुळे मोतेवारांवर याआधीच एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली.
दरम्यान, समृद्ध जीवन गृपनं विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचीही आरोप आहे. आर्थिक गुन्हे अन्वेशण विभाग याबाबत विशेष तपास करत असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.
Tags: Mahesh Motewar महेश मोतेवार Samruddha Jee Bank Account सहकार मंत्रालय बँक खाते
First P
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment