Monday, 5 September 2016

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक

साहित्य :४ वाट्या ओला नारळ खवलेला कीस ,  २ वाट्या किसलेला गुळ ,१/२ चमचा वेलदोद्याचे किंवा जायफळाची पुड
३ वाट्या तांदुळाची पीठी,३ कप पाणी,३ चमचे लोणी,१/२ चमचा मीठ (चवीपुरते)

कृती : एका भांड्यात खवलेला ओला नारळाचाकीस , किसलेला गुळ, वेलदोडे किंवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्या:पैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत एक चमचा लोण्यावर परतून घ्या व नंतर बाजुला ठेवा.
हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्याई बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी 1एक चमचा लोणी टाकून हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा. पीठ सोडत असताना पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. दहा मिनीटे भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर गरम होऊ द्या.
ही उकड गरम असतानाच चांगली मळुन घ्या. मळताना हाताला थोडेसे तेल लावा म्हणजे उकड हाताला चिकटणार नाही.
उकड मळुन झाल्यावर त्याचे लिंबा एवढे गोळे करा व गोळे पुरीच्या आकारात लाटा किंवा हातावर सपाट करा. नारळ आणी गुळाचे मिश्रण उकडीत भरा. उकड भरुन झाल्यावर सर्व बाजुने बंद करा व मोदक टोकदार करा.
मोदक तयार झाल्यावर एका भांड्यात पाणी ते भांडे गॅस वर ठेवा. त्या भांड्यावर चाळणी अथवा पातळ सुती कापड ठेवा. त्या चाळणीत अथवा कापडावर मोदक ठेऊन चाळणी अथवा कापड झाका. २० मिनीटे मोदक वाफेवर उकडुन घ्या. ही क्रिया तुम्ही ईडली पात्रात सुध्दा करू शकता.

झाले आता हे उकडीचे मोदक खाण्यास तय्यार ! हे उकडीचे मोडक साजूक तुपाबरोबर खायला द्या.

No comments:

Post a Comment