🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्वांसाठी वास्तू दोष विषयी खास माहिती जी कधी माहित नसते.
आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते.
★उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रगती चांगली होते.
★आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल.
★बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात.
★आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
★घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये .
भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये .
★झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते.
घरातील वय वर्ष २५ ते ६० असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे. उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे.
★घरामध्ये अडगळ ,भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखे आहे.
★घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज-बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात.
★नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहुन घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते.
★नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी.
★नवीन घर घेताना दक्षिण ,पश्चिम ,नैऋत्य आणि आग्नेय या दिशातुन येणारे दरवाजे टाळावेत.
★भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबु ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा.
★घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ उर्जा भक्कम रहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे.
★घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले ,पाने ,सुकलेली तोरणे काढून टाकावीत . म्हणजे घरामध्ये शुभ उर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाहीत.
★घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पुर्व भिंतींवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पुर्व व उत्तर या शुभ दिशांना होते.
★घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतींवर लावावीत म्हणजे कॅलेंडर कडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते.
★कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पुर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते .
★झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणुस कर्ज बाजारी होतो .
★घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेऊ नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते .
★सुख-समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा .
★बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असु नये .
लाल , काळा , मरून , हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरा मध्ये सुख - समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात .
★झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये . त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो .
★घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणुन मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे .
★ दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्न हर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे .
★घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे .
★आठवडयातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते.
★मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे .
★मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे .
★लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशे मध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात .
★घरामध्ये पैसा, संपत्ती , ऐश्वर्य टिकवून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे .
★घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे .
★ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात .
★नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा .
★मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष मुलांनी रोज म्हणावे .
★उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा- बायकोंनी दोन जोडलेल्या बेड वर झोपू नये .
★नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे .
★आरोग्यदायी जीवनासाठी घरा मध्ये पिवळा , काळा , लाल हे रंग कोठेही येऊ देवू नये .
★घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोअरिंग , विहीर पाण्याची टाकी बांधु नये .
★दक्षिणेला पाय करून झोपु नये कारण आरोग्य, पैसा व मानसिक ताण यांची हानी होते .
★घराच्या मुख्य दरवाजा जवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते .
★घराच्या मुख्य दरवाजा समोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक ,शारीरिक व मानसिक हानी होते .
★हिंस्र पशु पक्षांची, जंगली जनावरांची तोंडे , घरामध्ये लावु नयेत .
★घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवु नयेत .
★उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नयेत .
★उत्तम प्रगती साठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी .
★कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे.
★घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतींवर लावु नयेत .
★घरामध्ये कोठेही लाल ,मरून ,काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत .
★घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे लिंबु, , मिरची ,राक्षसाची तोंडे असे चित्र लावू नयेत .
★घरामध्ये अश्रु ढाळणारया स्त्रियांची ,पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावु नयेत.
★घराच्या मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले , वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवु नयेत .
★घराचा मुख्य दरवाजा पुर्ण उघडणे महत्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर कोणताही अडथळा ठेऊ नये .
★घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी सकाळ-संध्याकाळ धुप, अगरबत्ती, निरंजन लावणे महत्वाचे आहे .
★घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे , भांडणे टाळावीत .
★मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य, उत्तर किंवा वायव्येला असावी.
★मुलांचे स्टडी टेबल पुर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत .
मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबलचा आकार आयताकृती चौकोनी असावा गोलाकार नसावा .
मुलांच्या बेडवरती किंवा स्टडी टेबलवरती कपाट असु नये .
★आपल्या घराचे पार्कींग कोणत्याही दिशेस असो परंतु पार्कींगमध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी .
★नवीन कार घेताना लाल ,काळा व मरून कलर या रंगाची कार घेणे टाळावे .
★नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटसच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक येऊ देऊ नये .
★नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज तीन ,सहा ,नऊ अशी असावी अंकांची टोटल चार व आठ नसावी .
★कार प्रोटेक्शनसाठी कारच्या डिक्कीमध्ये खडे मीठ कापडी पिशवी मध्ये भरून ठेवावे .
★घराच्या आग्नेय दिशेला टॉयलेट पाण्याचे बेसिंग येऊ देऊ नये .
घर बांधताना ईशान्य दिशेला जिना येऊ देऊ नये .
★घराची उत्तर दिशा बंद असेल तर हेल्थ आणि वेल्थ प्रोब्लेम येऊ शकतात .
★घरामध्ये देवांचे फोटो भिंतींवर टांगुन ठेऊ नये त्यांचे पावित्र्य भंग होते .
घरातल्या कर्त्या व्यक्तिने वायव्य दिशेला झोपु नये .
★घरामध्ये कोठेही फॉल सिलिंग करु नये घराची उंची कमी होते त्यामुळे घरातील अडचणी वाढु शकतात.
इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी घराच्या आग्नेय दिशेला असावा .
ऑफिस मधले टेबल आयताकृती किंवा चौकोनी असावेत गोलाकार नसावेत .
★ऑफिस विकत घेताना ऑफिसचा दरवाजा उत्तर , पूर्व किंवा ईशान्येचा असावा .
★व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने उत्तर दिशेला तोंड करून बसावे .
ऑफिस मधील खिडक्या उत्तर आणि पुर्वे दिशेला असतील तर भरपुर प्रगती होते .
★व्यावसायिकाने झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजे व्यवसायात लाभ भरपुर होतो .
ऑफिसमध्ये अकाउंट डिपार्टमेंट उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे .
ऑफिसमध्ये लाल ,काळा ,मरून हा रंग वापरु नये .
★ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागा सुद्धा रिकामी ठेवावी .
★ऑफिसच्या आजुबाजूच्या परिसरामध्ये खड्डा ,चढ-उतार ,उंच वाढणारी झाडी अशा गोष्टी येऊ देऊ नयेत .
★ऑफिसमध्ये खुप मोठे देवघर ठेवु नये देवाचा छोटासा फोटो ठेवावा .
ऑफिसमध्ये इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी आग्नेय दिशेला असावेत.
ऑफिसमध्ये टॉयलेट हे वायव्य दिशेला असावे.
★देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे .
★घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे .
★गणपती बाप्पाची मुर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पुजा करताना आपले तोंड पुर्वे दिशेला करावे .
★देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मुर्ती कधीही ठेवु नये प्रत्येक देवाची एक मुर्ती ठेवावी .
★देवघरामध्ये उदबत्ती ,निरंजन आणि समई देवघराच्या आग्नेयेला ठेवावी .
सुख - समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी .
★दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावीत.
घरामध्ये जाळ्या-जळमटे कोळ्यांची घरटी लागु देऊ नये जाळ्या जळमटे
No comments:
Post a Comment