Tuesday, 14 March 2017

पापाची वासना नको दावू डोळा

नमस्कार सेवेकरी हो 🚩💐

🚩पापाची वासना नको दावू डोळां,
त्याहूनी आंधळा बराच मी II

निंदेचे श्रवण नको माझे कानी,
बधीर करोनी ठेवी देवा II

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा,
त्याहूनी मुका बराच मी II

नको मज कधी परस्त्रीसंगती,
जनातून माती उठता भली II

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा,
तू ऐक गोपाळा आवडीसी II

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

🚩आज दिनविशेष
(दि. १४ मार्च २०१७)

संत तुकाराम बीज निमित्ताने..
संत तुकाराम महाराजांना साष्टांग दंडवत!🚩💐

अभंग-
पापाची वासना नको दावू डोळां!

निरुपण - ब्रह्मांडनायक 🚩

दि. १४ मार्च २०१७!
संत तुकाराम बीज!

संत तुकाराम महाराजांना सर्वप्रथम साष्टांग दंडवत!

🚩संत तुकोबांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) होते.
इ. स. १५९८ या काळात देहु येथे संत तुकोबांचा जन्म झाला.

गुरु म्हणून तुकोबांनी केशवचैतन्य ( बाबाजी चैतन्य ) यांचेकडून दीक्षा घेतली.

वारकरी संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय या दोन संप्रदायांसाठी त्यांनी आयुष्य वेचले.

पाच हजारांहुन अधिक अभंग असलेला "तुकारामाची गाथा" हा ग्रंथ मराठी वाङमयात अजरामर आहे!

तुकाराम महाराज हे समाजसुधारक, विचारवंत, लोकशिक्षक, साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते.

वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला.

संत तुकारामांचे भावकाव्य म्हणजे अभंग!

हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत!
वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात.
त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांचेही मुखोद्गत आहेत हे विशेष!

इतिहास जाणकारांच्या मते "पापाची वासना" हा अभंग , महात्मा गांधीजींचा आवडता अभंग होता!

कदाचित याच अभंगावरुन महात्मा बापूंना "त्या" तीन माकडांची (वाईट बोलू/पाहु/ऐकू नये.) संकल्पना सुचली असावी असेही जाणकार सांगतात!

संत तुकोबा, "पापाची वासना" या अभंगाद्वारे आपणांस काय संदेश देतात; ते आपण आधी पाहु या!

पहिल्या चरणात तुकोबा सांगतात की,
हे देवा!
माझ्या डोळ्यांना पापाची वासना दाखवू नकोस;
त्यापेक्षा मला आंधळा बनव.
काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया हे सर्व षडरिपू ही पापांची मूळे आहेत.
माझ्या नजरेत या षडरिपूंपैकी एक ही पापाची वासना नको, त्यापेक्षा आंधळा होणे बरे!

माझ्या नजरेत वासना नको, राग नको, गर्व नको, कुणाचा मत्सर नको, कसलाही स्वार्थ नको आणि मायाजालही नको!

माझ्या नजरेसही अशी पापाची षडरिपूंपैकी वासना यावयास नको अशी विनंती ते ईश्वराकडे करतात!

दुस-या चरणात तुकोबा म्हणतात की,
कुणाची निंदा ही माझ्या कानी पडू देवू नकोस देवा!

आपण एक ऐकले की त्याला दुसरे जोडून लोकांना सांगत असतो; आणि आपणही निंदक बनतो! म्हणून निंदा कानी येणार असेल तर मला ठार बहिरा कर ना देवा!

तिस-या चरणात तुकोबा म्हणतात की,
अपवित्र वाणी (बोल) ही माझ्या मुखी नको!
अपवित्र वाणीने आपला आत्मा तर अपवित्र होतोच पण हे अपवित्र बोल ज्याच्यासाठी असतात, त्याचाही आत्मा दुखावतो!
माझ्या मुखी अपवित्र वाणी देण्यापेक्षा मला मुका बनव रे देवा!

चौथ्या चरणात तुकोबा म्हणतात की,
जीवनभर माझ्या मनात परस्रीचे आकर्षण वा संगत नको!
चारित्र्याला डाग लागून समाजात आपल्या नावाची माती होते असे दुष्कृत्य देवा माझ्या हातून घडू नको देवूस!

पाचव्या अंतिम चरणात तुकोबा म्हणतात की,
देवा! या सर्व बाबींचा मला कंटाळा आहे, कारण जळी- स्थळी-काष्ठी-पाषाणी-हृदयी सर्व ठिकाणी मला तुच दिसतोस; इतका तू मला आवडतोस!

आजच नव्हे तर सृष्टीच्या अंतापर्यंत या व इतरही सर्व अभंगाचे संस्कार मानवावर होणे अत्यंत आवश्यक आहे.

सामान्य माणसाने कसे वागावे याबद्दलचा दृष्टान्त देणारा हा अभंग मराठी साहित्यात अजरामर आहे!

🚩अशा या थोर संत तुकारामांना मानाचा मुजरा 🚩

🚩ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🚩

🚩नमस्कार सेवेकरी हो 🚩

👇🏻👇🏻

सर्व सेवेकरी भक्तांनी अवश्य लाईक आणी शेअर करा आपल्या स्वामी माऊलीचे अत्यंत सुंदर पेज "ब्रह्मांडनायक" 🚩
👆🏻👆🏻 https://mbasic.facebook.com/Anandrmuley/…

👆🏻 ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🚩

ब्रह्मांडनायक श्री स्वामी माऊली  ।।

No comments:

Post a Comment