गजाननाला वंदन करूनी,
सरस्वतीचे स्तवन करोनी,
मंगल शिवपद मनी स्मरोनी;
सद्भावाने मुदित मनाने,
अष्टांगांची करून ओंजळ,
वाहतो ही दुर्वांची जुडी
अभिमानाला नकोच जपणे
स्वार्थासाठी नकोच जगणे
विनम्र होऊन घालव मनुजा
जीवन हे हर घडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
विघ्न विनाशक गणेश देवा
भावभक्तीचा हृदयी ठेवा
आशीर्वाद हा द्यावा मजला
धन्य होऊ दे कुडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
पार्वतीनंदन सगुण-सागरा
शंकरनंदन तो दुःख हरा
भजनी पूजनी रमलो देवा
प्रतिमा नयनीं खडी
वाहतो ही दुर्वांची जुडी !!
No comments:
Post a Comment