Friday, 17 March 2017

शक्तिपात दीक्षा

🌟शक्तिपात दीक्षा 🌟
ज्यासमयी साधकाला शक्तिपात दीक्षा होते तेव्हा साधकाच्या ठिकाणी  अनंत प्रकारच्या क्रिया प्रकट होतात .
     जेव्हा गुरू शक्तिपात करतात  तेव्हा तत्काल अनादी निद्रेचा भंग होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होते . म्हणून प्राण प्रक्षुब्ध होतो . मूलाधारात त्याची गती रुध्द झाली की क्रिया सुरू होतात .आत्मशक्तीचे उद्बोधन झाले  की प्राणांची गती बदलून जाते . ते प्रक्षुब्ध होऊन सहस्त्राराकडे जाऊ लागतात .परंतु पुढे जाण्याला वाट न मिलाल्याने आधारचक्रामध्येच रुध्द होतात .त्याने शरीरात कंप उत्पन्न होतो .मूलाधारात प्राण रुध्द झाल्याने साधक आनंदित होऊन नाचू लागतो .आधारचक्रामध्ये प्राणवायूचा  निरोध झाल्याने तेथे साधकाला संपूर्ण विश्वाचे दर्शन होते .कुंडलिनी शक्ती मूलाधारातच निवास करते
तात्पर्य ,कुंडलिनी शक्ती साधकाच्या जागृत झाल्याचे पहिले लक्षण म्हणजे साधन चालू असताना शरीरात कंप उत्पन्न होणे.मानेत आणि दोन्ही हातांच्या मनगटात वेगवान स्पंदने जाणवतात
( हा माझा स्वत:चा अनुभव)
💢💢क्रमश:💢💢💢
प्रेषक - र . ल . देशपांडे जलगाव  Memory shared
।।श्री गुरुदेव दत्त ।।
🌻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment