|| होळीच्या ओव्या ||
आला फागुन महिना, आला होळीचा ग सन
झाला रंगाचा आठव, गेलं आनंदून मन
होळी सजवा सजवा, सडा सारवण दारी
फांदी चिरगुट बांधा, काढा रांगोळी साजरी
होळी पेटली पेटली, तिला दाखवा निवध,
घडा वाईटाचा भरे, झाला 'होलिके'चा वध.
तिला निवध तो काय, गोड पुरणाचीपोळी,
एक भाजला नारळ, ओंबी गव्हाळी गव्हाळी.
आता जळेल गारवा, उन डोक्यावर येई,
आणा शिव्या-शाप ओठी, पोट मोकळ ते होई
होळी पेटली पेटली, आला भैरवांचा 'टोळ'
तमो गुण सारे जाळा, होळी दुर्गुणांचा 'काळ'
- रमेश ठोंबरे
(अक्षरछंद)
No comments:
Post a Comment