Thursday, 2 March 2017

विडा घ्या हो स्वामी राया

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
_ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll_
_ll श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज की जय ll_
_ll श्रीमद सद्गुरू श्रीरामभक्त महाबली हनुमान की जय ll_
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
नमस्कार स्वामीभक्त हो,
*परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य भक्तशिरोमणी संजीवन योगी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज विरचित आरती आणि भजन आपल्या समोर प्रस्तुत होत आहे.*
*सौजन्य* :- _चित्रकार श्री. शेखर साने_
___________________________
🌹 *आरती- २* _( विडा )_ 🌹
=======================
विडा घ्या हो स्वामिराया l भक्तवत्सल करुणालया ll
देतो हात जोडोनियां ll भावें वंदुनिया पायां ll धृ ll
ज्ञानदृष्टी पुगिफळ ll तुमच्या कृपेचे हे बळ ll
मूळ आधार सोज्वळ ll पापी पतित ताराया ll १ ll
भक्तीदळ नागवल्ली ll पाने शुद्धही काढिली ll
नामबळे निर्मळ केली ll सिद्ध झालो जी अर्पाया ll २ ll
रंगी रंगला हा कात ll प्रेमभावाच्या सहित ll
त्याने केले माझे हित ll देह लावियला पायां ll ३ ll
चुना शांती निर्मळ ll त्वांचि दिले भक्तीबळ ll
करुनी मनासी कोमळ ll चरणी घातली ही काया ll ४ ll
वेलची ज्ञानज्योत ll सर्व भूतांच्या विरहित ll
ठेवुनी तुमच्या पायी हेत ll लागे मनासी वळवाया ll ५ ll
लवंग जाणां तिखट खरी ll घेउनी बुद्धीच्या चतुरी ll
क्रोध दवडीयला दूरी ll तूची समर्थ ताराया ll ६ ll
वैराग्याचे जायफळ ll तुम्ही दिले भावबळ ll
करुनी विरक्त निर्मळ ll शिरी ठेवियेली छाया ll ७ ll
पत्री क्षमेची या परी ll बापा मिळविली बरी ll
सदा राहोनी अंतरी ll सुखे सुखविते देहा ll ८ ll
काय बदामाची मात ll फोडुनि द्वैताचा हा हेत ll
वाढावया भक्तिपंथ ll सिद्ध केला करुणालया ll ९ ll
आत्महिताहित कस्तुरी ll घेउनी ज्ञानभक्तीपरी ll
धन्य हिची थोरी ll भविभवात ताराया ll १० ll
आनंद म्हणे केशर सत्य ll तुमचे पायी माझा हेत ll
पूर्ण केले मनोरथ ll कृतीकर्मासी वाराया ll ११ ll

ll अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय हो ll
ll श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ll
✨✨✨✨✨✨✨✨✨✨

No comments:

Post a Comment