Tuesday, 8 December 2015

2016 सुट्ट्यांच वर्षं

२०१६ 'सुट्ट्यांचं वर्ष';
नऊ लांबलचक विक एंड
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
डिसेंबर महिना सुरू होताच अनेकांना 'थर्टी फर्स्ट'चे वेध लागलेत... बऱ्याच ग्रुप्सनी पार्ट्यांचं प्लॅनिंग सुरूही केलंय... अशा सगळ्या सुट्टीप्रेमी, पार्टीप्रेमींसाठी आणि घरात वेळ देऊ इच्छिणाऱ्या नोकरदारांसाठी एक खुशखबर..
.
२०१६ हे वर्ष यावर्षीप्रमाणेच 'सुट्ट्याचं वर्ष' ठरणार आहे... पाच दिवसांचा आठवडा असणाऱ्या नोकरदारांना यंदा नऊ लांबलचक विकेण्डचा आनंद उपभोगता येणार आहे.
विशेष म्हणजे १ जानेवारीपासूनच त्याची सुरुवात होतेय. अनेक राष्ट्रीय सुट्ट्या आणि बरेच सण २०१६ मध्ये शुक्रवारी किंवा सोमवारी आलेत. त्यामुळे 'फाइव्ह डेज वीक'वाल्यांची चंगळ होणार आहे.
यंदा १ जानेवारी शुक्रवारी आहे. त्यामुळे १, २, ३ जानेवारी अशी सलग तीन दिवसांची सुट्टी या मंडळींना मिळेल.
त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीही शुक्रवारीच येतेय.
Iमार्च आणि एप्रिलमध्ये तर गुरु-शुक्र-शनि-रवि असा मणिकांचन योगच जुळून आला आहे. २०१६ मध्ये दिवाळीही एकदम दणक्यात साजरी करता येणार आहे. त्यावेळी दोन-तीनच नव्हे तर पाच सुट्ट्या लागून आल्यानं सेलिब्रेशनला वेगळीच रंगत येईल. एखादा दिवस सुट्टी घेतल्यास लक्ष्मीपूजनानंतर तीन-चार दिवसांचा एखादा झक्कास दौराही करता येऊ शकतो. फक्त त्याची आखणी लवकरात लवकर करावी लागेल. कारण, या लांबलचक सुट्ट्यांच्या काळात रिझर्व्हेशन फुल्ल आणि हॉटेल हाऊसफुल्ल होण्याची दाट शक्यता आहे. तर मग, थर्टी फर्स्टच्या प्लॅनिंगनंतर लगेचच २०१६ च्या सुट्ट्याच्या प्लॅनिंगलाही सुरुवात करा! २०१६ मधील लांबलचक सुट्ट्या अशाः मोबाईल

No comments:

Post a Comment