Thursday, 30 March 2017

स्वामी समर्थ महाराज विरचीत अभंग

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटनाचे वर्णन करणारा श्री स्वामीसुत महाराज विरचित अभंग !!

दत्त माझा अवतरला l दीन भक्ताच्या काजाला।।
छेलीखेड्या ग्रामामाजीं। झाला अवतार सहजी।।
गोटी खेळण्याचा रंग। तेव्हा 'हरि' झाला दंग।।
तेव्हा होता रामसिंग। आतां येथें करूं रंग।।
गजानन आनंदला। पाहूनियां त्या खेळाला।।
नाचताती चहू कोणीं। नूपुरें वाजती चरणीं।।
गोटी गोटीचा हो वाद। हरीचा हसण्याचा छंद।।
हंसू लागे वक्रतुंड। हलवूनी प्रीति सोंड।।
विष्णु स्तंभी प्रकटले। दत्त गोटी फोडुनि आले।।
माझ्या स्वामींची करणी। कंप होतसे धरणीं।।
गोटी रामसिंग मारी। दुसरी गोटी होय करीं।।
गोटीचा हो पडला ढीग। चकित झाला विजयसिंग।।
गोटी स्वामी माया झाली। स्वामीहस्तीं ती शोभली।।
गोट्या झाल्या रानोमाळ। काय मौजेचा हा खेळ।।
एक प्रहर खेळ केला। समर्थें दाविली ती लीला।।
स्वामीसुत म्हणे झाला। अवतार, भक्ताच्या काजाला।।

!! श्री स्वामी समर्थ !!
शुभ स्वामी सकाळ

No comments:

Post a Comment