कैवल्याचा गाभा l ज्योति सौदागर
क्रमण पदी उभे आहे रूप मनोहर ll
विष्णू रूपी अंश मानू शेषाचे आसन
त्रिशूल डमरू हाती धरिले महेशा समान
ब्रम्हरूप आत्मा आहे परब्रह्म पुर्ण
जमदग्नी रूप प्रकटें रणांगणी जाण ll
खड्ग धरियेले हाती दुर्जना वधाया
हातामध्ये अमृत वाटी जना उद्धाराया
रूप पाहता लोचनीं मना सुख वाटे
दीनानाथाच्या या मनी आनंदाश्रू दाटे ll
No comments:
Post a Comment