पौगंडाच्या सूता तुझ्या पायी माझा माथा
ब्रह्म विष्णु शिव अग्नी स्वरुप अनंता ll
माय बाप तप करिती ,शनि प्रदोषा चरती
होऊनीया पुत्र त्यांचा भेटसी अनंता ll
अगस्तीचा शिष्य विंध्य,कर्म करी परी निंद्य
सूर्यरथा अडवायासी ऊंच करी माथा ll
दक्षिणेसी पडता छाया,दैत्य देसी त्रास जाया
स्नान संध्या बुडली म्हणती ऋषि मुनि आता ll
भार साहीना पृथ्वीला,झाली मग गाय
क्षीरसागरी जाऊनी भेटली अनंता ll
अभय देऊनिया विष्णु ,म्हणे होई शांत
दैत्य दुष्ट दमनासाठी ,निघालोच आता ll
येउनिया अवतारासी ,दैत्य संहारिले
दीनानाथ भक्त पदी , लीन अनंता ll
पौगंडाच्या सुता तुझ्या पायी माझा माथा ll
No comments:
Post a Comment