ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे l
त्या त्या ठिकाणी नीजरुप तुझे l
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी l
तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही ll
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची l
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ll
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी l
सर्वहि तीर्थे घडली आम्हा आदिकरूनि काशी l
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची ll
मृदंगतालघोळी भक्त भावार्थे गाती l
नामसंकिर्तने नित्यानंदे नाचती ll
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची ll
कोटी ब्रह्महत्या हरती करीता दंडवत l
लोटांगण घालितां मोक्ष लाभे हो पायांत l
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची ll
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमासी l
अनुभव ते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी l
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची ll
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरविला l
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ll
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची ll
No comments:
Post a Comment