Monday, 10 August 2015

जय हरी विठ्ठल _ हरी विठ्ठला हरी विठ्ठला

हरी  विठ्ठला हरी विठ्ठला 

पुंडलिकाच्या भेटीसाठी ,धावत येइ तो जगजेठी
दोन्ही कर ठेउनिया कटी
युगे युगे विटे वरी ऊभा राहिला ll

एकनाथांच्या भेटीसाठी ,धावत येई तो जगजेठी
खांदि कावड आवड मोठी
युगे युगे कावडीने पाणी वाहिला ll 

चोखा ,तुका ,नामासाठी ,धावत येई तो जगजेठी
भक्त उद्धाराया वाळवंटी  राहीला ll 

जय जय विठ्ठल ,जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल ,जय हरी विठ्ठल  ll

No comments:

Post a Comment