सुहास्य मुख्य विशाल नयन ,माजी सुदयाचे अंजन l
सरळ नासिका असशी सुमन ,तेंवि भान नेटके ll
कर्दळी कोंदणी सतेज, हीरे जोडिले मुखीचे द्विज l
किंवा दालिम्बियाचे बीज ,अधरपुटि जोडिले ll
जड़ित नाकीचे सुपाणि ,तेणे शोभली जगज्जननी l
कपाळी मळवट भरुनी ,भव्य भवानी साजीरी ll
भांगी भरला आरक्त सिंदूर, कस्तूरी तिलक भालावर l
वेश्टुनि बांधला कम्बरिभार ,वरी मुकुट साजिरा ll
जैसी ओळीने जोडिले भास्कर,तैसे मुकुटमणि अपार l
मयूरपिच्छे मुकुटावर ,तूरा खोविला अम्बेने ll
कवडी दर्शनाचा हार्ट ,अपार रूळती धरणीवर l
ऊर्ध्व हस्ते त्रिशूल डौर , झेलीत असे जगदम्बा ll
ऐसे भगवतीची मूर्ति ,भक्ते नीजभक्ते देखीली अवचिति l नमस्कारूनि परम प्रीती ,चरण धरिले अम्बेचे ll
कंठ दाटला प्रेम भरून ,मुखी ना निघे काही वचन l
नयनोदके चढ़ने क्षालन ,दाटला पुर्ण गहिवरे ll
ऐसे देखोनि ततक्षणी ,प्रसन्न झाली त्रिजगज्जननी l
मस्तकी ठेविला वरदपाणि ,अमृत वाणी बोलली ll
आता माग इच्छित मना ,जे तव असेल मन कामना l
ते पुर्ण करीन जाण मना ,न सरे सहसा दूसरेने ll
आत्मानुभवे बोले वचन ,तूं न जाय माझे हृदयातून l
म्या तुझे जे केले स्तवन ,त्या स्तवनी प्रीत राहो तुझी ll
दिधले म्हणोनी बोले वाणी ,आता तूं न भी अंतकरणी l
तुझे मनीची इच्छा झणी ,पुर्ण केली निर्धारे ll
हॅ स्तोत्रे जौ करील पठण ,त्याची कामना होईल पुर्ण l
संशय धरीता अधपतन ,पावेल तो निर्धारे ll
ऐसी बोलोनी वरदवाणी , प्रसन्न मुख जगज्जननी l
भक्ताचिये हृदय सदनी ,तैसीच मूर्ती ठसावली ll
मूळ पीठ ते भक्त हृदये ,तेथे अक्षय मूल माये l
वास्तव करुनी नांदे स्वये ,सहयोगिनी समवेत ll
करुनी साष्टांग नमस्कार ,विनंती करी वारंवार l
ऐसेच अम्बेने निरंतर ,मम हृदयी वसावे ll
No comments:
Post a Comment