Sunday, 9 August 2015

श्री यमाई _यल्लम्मा यमाई माऊली माझी थोर

यल्लम्मा यमाई  ही माऊली माझी थोर l
तिच्या दर्शनासी मन झाले हे विभोर llध्रुll

कुलस्वामिनी तू माझी माझ्या कुळाची
नित पुरवि कामना माझ्या अन्तरीची
माय भवानी अम्बा तुझा महिमा थोर ll

चौंसठ योगिनी सवे जमला तो मेळा
हाती दिवट्या घेतल्या प्रचंड त्या ज्वाळा
उदोउदो अम्बे तुझा जयजयकार ll

एकवीरा अन्नपूर्णा विश्व माऊली तू
भक्त पालन करिशी कृपा सावली तू
उमा लक्ष्मी सरस्वती घेसी अवतार ll

विश्व जननीची माया सहस्त्र गुणी
कोड पुरवी भक्तांचे जीवीत्व वेचुनी
मम हृदयीं वसे ही अम्बा निरंतर ll

भाग्यवती तू जननी परशुरामाची
सकल दैवतावरी तव सत्ता साचि
दैत्य निर्दालूनि करी भक्तांचा उद्धार ll

No comments:

Post a Comment