जय देव जय देव ज्योतीबा देवा
आशिर्वाद भोळ्या भक्तांना द्यावा l
जय देव जय देव जय जय केदारा
दासा संकटी तारा भवभय अपहारा ll
दक्षिण काशीची उत्तर दिशा
डोंगरी वसतो देवांचा राजा
भक्तीचा नैवेद्य अर्पून माझा
तुझ्या चरणी माझा सुखाचा ठेवा ll
देवांचा कैवारी भक्तांचा वाली
अशी तुझी कीर्ति मुलुखात झाली
जगात साऱ्याना प्रचिती आली
भक्तीचा नैवेद्य अर्पुण वाही ll
उत्तरेचा देव दक्षिणी आला
दक्षिण केदार नामे पावला
रत्नासूर मर्दोनी भक्ता पावला
दास दीनानाथ चरणी लागला ll
No comments:
Post a Comment