शांत तुझे रूप नाथा ,शांत तुझे रूप l
पाहुनिया भक्ता होतो ,आनंद अमाप ll
कोणी म्हणती सौदागर l कोणी रवलनाथ l
जोतीबाचा चांगभला l जन बोलतात ll
ब्रह्मा विष्णु महेश्वर l त्रिगुणरुपी नाथ l
जमदग्नी राग चवथा l म्हणुनी रवलनाथ ll
घोड्यावर स्वार होती l करविरासि जाती l
महालक्ष्मीची भेट l शनिवारी घेती ll
नाथ स्वरूप पाहुनी l दीनानाथ डोले l
पदी मस्तक ठेऊनि l चांगभला बोले ll
No comments:
Post a Comment