Saturday, 15 August 2015

श्री दत्त - दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे

दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे l
जन्मो जन्मीची ती पापे दत्ता जळून खाक होऊ दे ll

गृह पुत्र धन धारा, अवघा मायेचा पसारा
मोह पाश सोडून सारे मुक्त मला होऊ दे रे
जन्मो जन्मीची ती पापे दत्ता जळून खाक होऊ दे
दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे  ll

तुच माझा मायबाप, दुर करी भवताप
फेरा चुकवून चौ-यांशीचा पायी तुझ्या ठाव दे रे
जन्मो जन्मीची ती पापे दत्ता जळून खाक होऊ दे
दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे  ll

No comments:

Post a Comment