उठा उठा हो सकळीक
नाम मुखी घ्या ज्योति स्वरूप ll
केदारनाथा केदारेश्वर
ज्योतिर्लिंगाची अनेक रुप ll
ज्योतीस्वरूप हे जगी प्रकटले
हिमालयाचे ध्यान सोडले
दीनदुबल्यांची करूनी सेवा
उंच डोंगरी चक्र धरिले ll
रत्नासूराचा क्रोध प्रकटला
देव देवीना छळु लागला
त्रिशूलधारी नाथ प्रकटती
रत्नागिरी केदार ll
विमला माता पिता बैरागी
पुत्र तयाचे जगात ख्याती
आशिष देती भक्त जनाना
नाथांचा अवतार ll
No comments:
Post a Comment