Sunday, 30 August 2015

श्री रेणुका प्रसन्न - तू ते आहे विश्व जननी

तूं ते आहे विश्वजननी ,तुझी माया सहस्त्र गुणी  l
कासव दृष्टि करुनि , न्याहळून पाहे बाळाते  ll
जेवि वत्सा टाकुनिया गाय ,चरावयासी वनी जाय l
परी ते वत्स दर्शनी आर्त होय ,सर्वदा उतावेळ होऊनी ll

उदर तृप्ति झालीयेवरी ,हुम्बरत धेनू धावे घरी l
तैसेचि येईल त्रिपुरसुंदरी ,स्तनपान करवीं बाळाते ll
निष्ठुर होऊ नको माय ,आता निदान पाहसी काय l
सत्वर येऊनी दावी पाय ,पावन करी अम्बे तू  ll

ऐसी ऐकोनी आकाशवाणी ,सत्वर धावेल जगतजननी l
आले आले म्हणोनी ,आकाश ध्वनी उठला  ll
कवण्या दुष्टे माझा भक्त, गांजिला म्हणोनी अम्बा तप्त l
धावे तेव्हा पाताळ सप्त ,दणाणिले भयंकर  ll

सिंहारुढ होऊनी जगज्जननी ,खड्ग झाडि क्षणोक्षणी l
पवन वेगे करुनि ,भक्ति सदना पातली  ll
चौंसठ योगीनीचा मेळा ,हाती दिवट्या प्रचंड ज्वाळा l
उदोउदो वेळोवेळा ,गर्जना करी आनंदे  ll

No comments:

Post a Comment