ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ,
समे कामांन कामकायाय मह्यम्
कामेश्वरो वैश्रवणो ददातु
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ll
जय देवा जय देवा जय धनाध्यक्षा
शिवमित्रा पौलस्या पिंगलिएकांक्षा ll
पद्म महापद्म शंख मकर
कच्छप मुकुंद वर्चस अन निल
औशा महानिधीचा अधिपती तूं देव
उत्तरेचा स्वामी तूं लोकपाल ll
बालाजी लग्ना तूं धन पुरविले
तिरुपती गिरिवर कायम बसवले
रघूराजास्तव केली तूंची धनवर्षा
राजाधिराजच्या प्रगटसि आदर्शां ll
धनधीपती तूं तुजला म्हणती कुबेर
जगपालक विष्णूचा असशी अवतार
ऋषीमुनि गंधर्वादि तुज ध्याती नित्य
वंदुनि तुजला गाती तुझेच स्तुतिस्तोत्र Il
सभेत तुझिया शोभती शिवशंकर अम्बा
तुझिया अंकित झाली श्री लक्ष्मी वरदा
भाग्यविधात्या देव शरण तुझ्या चरणी
कृष्ण भारती स्वामी कर जोडुनी दोन्ही ll
No comments:
Post a Comment