ज्योति स्वरुप ध्याता l सुखाचा कुम्भ येई हाता ll
ऋषीमुनी ध्याती l तप आचरती l
गिरी कन्दरी l जाऊन राहती l
निज देहाची l तमा न धरती l मोक्ष पदा करिता l
सुखाचा कुम्भ येई हाता ll
रक्तभोज रत्नासूर करिती l
जोतिबाची विरोध भक्ती l
नाथा हस्ते मरण मागती l उद्धाराकरिता ll
संसारी या करिता भक्ती l
सहज हाता ये चारी मुक्ती l
दीनानाथ भक्त करी विनंती l नाथ दिना स्मरता l
सुखाचा कुम्भ येई आता ll
No comments:
Post a Comment