Friday, 14 August 2015

जय अम्बे जय जगदम्बे -देवी माय भवानी आमुची

देवी मायभवानी आमुची देवी मायभवानी
विश्व विजयनी विश्व पुजिता विश्वाची जननी ll 

तेजस्विनी ही स्वरूप सुंदर l
चरणकमली रूणझुणती नुपुर l
घेऊनी करी मधुकलश जगा ही देई संजीवनी  ll

शिवशम्भुची ही प्रिय गृहिणी l
प्रेममूर्ती ही शिव कल्याणी  l
वत्सल अम्बा ही जगदम्बा भक्तां वरदायिनी  ll

कामी राक्षस येता जवळी  l
द्वंद्व युद्ध तेधवा खेळली  l
शिवशक्ति निर्दाळी तेव्हा असुर धनुर्धारीणी ll

दानव जेव्हा प्रमत बनती l
मंगलसृष्टी नाशु पाहाती  l
रुद्रानी ही बने तेधवा उग्र रुपधारीणी  ll

महाकाली ही सिंहवाहिनी  l
अष्टभुजातुनी शस्त्रे घेऊनी  l
दानव सेना आत्मशक्तीने टाकी विध्वंसुनी  ll

मदिष लागला छळू लागला l
या दूर्गेने वधिलें त्याला  l
अष्टभुजा मग प्रसिद्ध झाली महिषासुरमर्दिनी ll

शुंभ निशुंभे इंद्रा जिंकुनी  l
राज्य स्थापिलें स्वर्गामधुनी  l
इन्द्रानेही नमिली तेव्हा हीच विघ्ननाशिनी  ll

No comments:

Post a Comment