Thursday, 20 August 2015

श्री शंकर आरती - जय देवा नीलकंठा

जय देवा नीलकंठा l सकल देवा आदिश्रेष्ठा l
रंक मी शरण आलो l निवारी भव कष्टा  ll

निर्गुण निर्विकारा  l शिव कर्पूर गौरा  l
व्यापुनी चराचरी   l होसि प्रकृति परा ll
अगणित कोटी लिंगे l पुराण प्रसिद्ध बारा l
एक तरी दृष्टि पाहे  l अन्यथा भुमी भारा l
जय देवा नीलकंठा  l सकल देवा आदिश्रेष्ठा ll

सोरटी सोमनाथ  l जगी एक विख्यात l
तयाच्या दर्शने हो  l चुके संसारपंथ  l
हिमवंत पृष्ठभागी  l लिंग केदार मुक्त l
साधु संत सेविताती l धरुनी कैवल्य हेत ll
जय देवा नीलकंठा ll

उज्जयिनी नाम पूरी l पवित्र सचराचरी l
महाकाल लिंग जेथें l धन्य जो पूजा करी l
ओंकार महाबळेश्वर lज्योतिर्लिंग निर्धारी  l
तयाच्या स्मरणे हो  l जन्म मरण निवारी  l
जय देवा नीलकंठा ll

पश्चिमे लिंग एक  l जया नाम त्र्यम्बक  l
गौतमी उगम जेथे  l वाहे मंगल दायक  l
दर्शन स्नान मात्रे  l पुण्य पावन लोक  l
तैसाचि घृष्णेश्वर  l सेवाळे रमणीक l
जय देवा नीलकंठा ll

भीमेचा उगम जेथे  l भीमाशंकर तेथे  l
डाकिणी स्नान करिती l लिंग म्हणती तयातें l
अगणित पुण्य जोड़े l चालताचि नेणे पंथे l
दक्षिण रामेश्वर  l ज्योतिर्लिंग म्हणती तयातें l
जय देवा नीलकंठा ll

आवन्ढ्या नागनाथ  l देव आपण नांदत  l
भक्तजन कुटुंबीया  l भुक्तिमुक्ति-दायक  l
प्रत्यक्ष लिंग जेथे  l परळी वैजनाथ  l
हरिहर तीर्थे तेथे  l जय होय कृतांत l
जय देवा नीलकंठा ll

श्रीशैल तो पर्वत  l लिंग रुप समस्त  l
सभोवती निलगंगा l माजी श्री मल्लिनाथ l
भूमि कैलास दुजा  l जन साक्ष दावीत  l
साठी वरूषे वाट पाहे  l कृपाळु तो उमाकांत l
जय देवा नीलकंठा ll
धन्य हो काशीपुरी  l मणिकर्णिका तीरी l
विश्वेश्वर लिंग जेथे  l जीव मात्रा उद्धारी l
तारक ब्रह्म मंत्र  l जपे कर्ण विवरी l
तेणेचि मोक्ष पद l प्राप्त होय निर्धारी l
जय देवा नीलकंठा ll

येऊनिया संसारा l ज्योतिर्लिंगे बारा  l
एक तरी दृष्टी पाहे  l  अन्यथा भूमिभारा l
जय देवा नीलकंठा सकल देवा आदिश्रेष्ठा ll

No comments:

Post a Comment