Monday, 10 August 2015

श्री दत्त प्रसन्न _ मुखी तुझे नाम राहो

मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया
कृपादृष्टी आम्हांवरी असो देवराया ll

तिन्ही लोकी देवा तुझा आहे रे निवास
कृपा लाभता भक्तांना एक तुझा ध्यास
नको स्वार्थ दत्ता आता नको मोह माया ll

अनसूये दारी जेव्हा तिन्ही देव आले
ब्रह्मा महेश विष्णु तिन्ही बाळ झाले
पित्यावीण लाभे तुजला नवा जन्म देवा ll

दयावंत तू भगवंता आहे रे महान
तुझी भक्ति करीता तेव्हा होशीरे प्रसन्न
पदी लीन झालो आता असू द्यावी छाया ll

No comments:

Post a Comment