Sunday, 16 August 2015

श्री प्रभाकर स्वामी -श्री गुरुराया दाखीव किमया

जय जय गुरु महाराज गुरु
जय जय परब्रह्म सद्गुरु  ll

श्री गुरुराया दाखीव किमया एक आशा पूरवी
स्वामी धूळ पदीची हवी ,
हो  स्वामी धूळ पदीची हवी  ll

धूळ पदाची या दासाला फूल पदावर नेतो
सुमनांची ह्या अर्पूनी माळा रोज आनंद मी घेतो
दया करावी दिगम्बरा रे सत्संगि या खेळवी ,

स्वामी धूळ पदीची हवी  ll

तो अौदुंबर त्याच ठिकाणी अजूनी तिथे आहे
गूरूमहिमेचे ते पारायण श्रवण करिती आहे
कैक पिढ्या त्या नान्दुन गेल्या,
नवनवी निर्मितसे पालवी ,स्वामी धूळ पदीची हवी ll

नकळत करिशी करणी ऐसी सुधबुध माझी जाई
नेशील तेथे वळशील पद हे मज दुजी संगत नाही
न मज भूवरी तूं कोठे ही दाही दिशा नाचवी
स्वामी धूळ पदीची हवी  ll

पुजन तुझे निशदिन करितो वेड मला हे आहे
स्तवन करितो श्रवण करितो भजनी सूखे मन राहे
करुणेश्वर तूं कर करूणा तू लीला तुझी दाखवी,
स्वामी धूळ पदीची हवी  ll

प्रतिमा गुरूंची सदनी बसते हसते श्री गूरूमूर्ति
काय कमी ना श्री गुरु कृपे येई सुखाना भरती
शरण आलो मी पहिल्या भेटी मागणी नाही नवी
स्वामी धूळ पदीची हवी  ll

कर हे जुळती साधु पुढती अंतरी श्री गुरु राही
होईल कैसे मम कल्याण धूळ मिळे जर नाही
तन मन रमते मधु भजनात कधी तरी तू बोलवी
स्वामी धूळ पदीची हवी ,हो स्वामी धूळ पदीची हवी ll

No comments:

Post a Comment