Saturday, 15 August 2015

श्री तुळजाभवानी - तुळजापूरची सत्यमाता

ही तुळजापूरची नगरी ,बैसुनी त्रिकुट शिखरावरी
षटचक्राचा .कौल लावूनि तुलजामता
तुळजापूरची सत्यमाता ,अम्बा तूची कुलदेवता ll

गंगा यमुना सरस्वती ,गोमुखातुनी वाहती आता
कल्लोळी स्नान दर्शन घेता,दुरीतकर्म हरिते आता
रामराजाची राम वरदायिनी ,
धर्मराजाची दुर्गा देवी , छत्रपतींची तुळजाभवानी ,
भक्त जणांची जगन्माता जननी ,
भक्तवत्सले तुकाआई तूं ,महिषासुर मर्दीनी माता तूं
महाराष्ट्रास यश दे आता ,तुळजापूरची सत्यमाता  ll

अम्बा दर्शन दे ,दर्शन दे तूं मला ,
देवी पाव मला , आलो शरण तुला ,
सिंहावर आली स्वारी ,नवआयुध घेऊन हाती
कर संहार तूं दुष्टांचा ,संकट निवार तूं तूं आता
देहलक्ष ध्यानमुद्रा ,झळके ब्रह्मी ज्योत आता
संकंटनिवारिनि माता ,तुळजापूरची सत्यमाता  ll

टोप डोइला मळवट भारी
शालू चोली नेसली जरतारी
रंगचौकात भरुनी ,रत्नजड़ित सिंहासनीं
अम्बा त्यावरी बैसली,कासें पिताम्बर लेऊनि
नवरत्नांचे दागिने दिसे शोभूनी
अम्बा खेळण्या पवणपोत, निघाली आनंदाने हो
ओवाळू नवखन्डिच्या नऊ आरत्या आता
तुळजापूरची सत्यमाता , अम्बा तूची कुलदेवता ll

No comments:

Post a Comment