झुंजुमुंजु झाले आता उठा गुरु राया
रवि किरणांची शोभा मिळेल बघाया ll
देऊन दुधाची धार धेनू रानी जाई
वसन्तातील कोकीला गोड गाणे गाई
चिवचिव त्या चिमण्यांचा तुम्हा जागवाया
झुंजुमुंजु झाले आता उठा गुरुराया ll
कळ्या वेलीवरच्या साऱ्या आल्याति फुलाया
पहाटेशी यावे देवा सुगंध लुटाया
ढवल्या पवल्या जाती मोट ही धराया
झुंजुमुंजु झाले आता उठा गुरुराया ll
झुळुझुळु वाहे पाणी नदीच्या किनारी
मंदिरात भगवंताच्या दंगले पुजारी
शंख नाद कानी पडतो तुम्हा जागवाया
झुंजु मुंजु झाले आता उठा गुरुराया ll
No comments:
Post a Comment